राजापूर तालुक्यात १० वर्षांत २३ बिबट्यांना जीवदान

0

राजापूर : विविध कारणांमुळे बिबट्यांची संख्या घटत चालली असून त्याबाबत वन्यप्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र वन विभागाने राजापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांत फासकीत अडकलेल्या वा विहिरीत पडलेल्या तेवीस बिबट्यांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून त्यांना पुन्हा एकदा जंगलामध्ये मुक्तपणे संचार करण्याची संधी दिली आहे.

राजापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणातल जंगल लाभले असून त्यामध्ये विविध प्रकारची दुर्मिळ श्वा पदे, प्राणी आणि पक्ष्यांचा वावर असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलतोडीसह अन्य कारणांमुळे या जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात आले असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. त्यात वन विभागाने आपला वाटा उचलला असून जंगलातील साधनसंपत्तीच्या रक्षणाची जबाबदारी चोख बजावली आहे. रानटी डुक्कर वा अन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलामध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी फासक्या लावल्या जातात. त्यामध्ये रानटी डुकराऐवजी अनेकवेळा बिबट्याच अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याची योग्य वेळेत सुटका केली नाही, तर त्याच्या मानेला फास आवळून मृत्यूचा संभव असतो. अशा फासकीत अडकलेल्या बिबट्यांना जीवनदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. लोकवस्तीमध्ये घुसलेला बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना उघड्या मात्र पाण्याने भरलेल्या विहिरींमध्ये पडल्याच्या घटनाही अनेकवेळा घडल्या आहेत. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीत पडलेल्या बिबट्यांचीही सुखरूप सुटका केली आहे. सुटका केलेल्या या बिबट्यांना मुक्तपणे जगता यावे यासाठी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

गेल्या दहा वर्षांत जीवदान मिळालेल्या बिबट्यांची संख्या अशी : २०१० साली १ बिबट्या, २०११ – १, २०१२ – १, २०१३ – १, २०१४ – २, २०१५ – ३, २०१६ – ४, २०१७ – ३, २०१८ – १, २०१९ – २, २०२० – ४.

सुमारे पाच वर्षांपूर्वी राजापूर तालुक्यातील ओणी येथे भक्ष्याच्या पाठलाग करणारा दुर्मिळ ब्लॅक पँथर विहिरीत पडला होता. त्या घटनेच्या आधारे तालुक्याच्या विशेषतः सह्याद्रीच्या जंगलझाडीमध्ये ब्लॅक पँथरचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले होते. तशाच प्रकारे आता जानशी-बाकाळे परिसरामध्ये दुर्मिळ असलेल्या ब्लॅक पँथरचा मुक्तपणे संचार असल्याचे चर्चिले जात आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाले नसले, तरी ब्लॅक पँथर असण्याची शक्यता वन विभागाने नाकारलेली नाही. त्यामुळे बिबट्यासह दुर्मिळ प्रजाती असलेल्या ब्लॅक पँथरच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सार्यांानी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 17-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here