महाराष्ट्रात जे सत्तानाट्य गेली 1 महिना सुरू होतं ते सत्तानाट्य आता उद्या संपणार आहे. महाआघाडीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उद्याच्या उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांना दिले आहेत. त्यावर घटनेतील लोकशाही मूल्ये जपल्याबद्दल न्यायालयाचे आभार, असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं आहे.
लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक तत्त्वे टिकवून ठेवल्याबद्दल मी न्यायालयाने अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. आज संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निकाल दिलाय, याचा आनंद आहे. बाबासाहेबांना त्रिवार वंदन, असं ट्वीट पवारांनी केलंय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर, भाजपचा खेळ खल्लास होणार आहे. आम्ही 162 आहोत… उद्या तो आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे, उद्या आम्हीच बहुमत सिद्ध करणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नव्याने अध्यक्ष निवड करण्याची गरज नाही. हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा. पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथ विधी पूर्ण व्हावा आणि त्यानंतर तातडीने विधीमंडळाच्या पटलावर बहुमत चाचणी व्हावी. गुप्त मतदान होणार नाही आणि या सगळ्या घटनेचं लाईव्ह टेलिकास्ट करा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
