खासदार उदयनराजेंनी ‘त्या’ वेळी भीक मागून जमा केलेले ४५० रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी केले परत

0

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या विरोधात काही दिवसांपूर्वी भीक मांगो आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी दिलेली ४५० रुपयांची रोख रक्कम कायदेशीररित्या स्वीकारता येत नसल्याचे पत्र देत जिल्हा प्रशासनाच्यावतीने उदयनराजे भोसलेंनी दिलेले पैसे त्यांना निवासस्थानी जाऊन परत देण्यात आले आहेत. साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी आंदोलनातील कोणतीही रोख रक्कम स्वीकारता येत नसल्याचे सांगत ही रक्कम परत केली आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी दिलेली रक्कम ही कायदेशीररित्या स्वीकारता येत नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना दिली आहे. रोकड एका पाकिटात घालून तिच्यासोबत ते पत्र जोडून उदयनराजेंच्या जलमंदिर येथील कार्यालयात जमा केली आहे. तसेच, कार्यालयाची पोच देखील घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 17-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here