राजकारणावरचा विश्वास उडाला,एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय हाचालींना वेग आला आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनासेबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर दोन दिवसातच सिंचन घोटाळाप्रकरणी नियमित चौकशी तूर्तास बंद करण्यात आली. यानंतर अनेकांकडून यावर टीका करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील राजकारणावरचा विश्वास उडाला असल्याचे सांगत भावना व्यक्त केली आहे.

HTML tutorial

‘देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचा पहिला दिवस. त्यांनी चार्ज घेणं, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होणं, त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकणं आणि बातमी येणं की सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची फाईल बंद, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, अशी शंका का घेता? हा योगायोग आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

जळगावमध्ये एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘आपल्याला गेल्या महिन्याभरात हजारो फोन आले. शेकडो लोक भेटून गेले. त्यात अनेक जण आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतात की नाथाभाऊ, आपल्यासारखी सिनिअर माणसं जर आता राजकारणात असती, तर महाराष्ट्रात हे चित्र नसतं,’ असे खडसे म्हणाले.पुढे बोलताना ते म्हणाले, कदाचित युती तुटली नसती, सध्याचं संकट आलं नसतं आणि चित्र वेगळं असतं, वेगळी दिशा समाजाला मिळाली असती, असे एकनाथ खडसे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here