जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी च्या वतीने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देऊन जपली सामाजिक बांधिलकी

0

रत्नागिरी : येथील जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी च्या वतीने रत्नागिरी येथील महिला कोविड रुग्णालय येथे जिल्हा भरातून येणाऱ्या अतिगंभिर रुग्णाचे नातेवाईक याना लॉक डाऊन चे कालावधीत सर्वच हॉटेल्स बंद असल्याने जेवणाची अत्यंत अवघड अवस्था होऊन गेली होती या बाबत पतसंस्थेचे चेअरमन श्री परशुराम निवेंडकर याना या बाबत काही आरोग्य व्यवस्थेतील मंडळींनी कल्पना दिली व आपण पतसंस्थे मार्फत मदत करावी असे आवाहन केले होते. त्या प्रमाणे श्री. निवेंडकर यांनी पतसंस्थेतील सहकारी संचालकांना याची कल्पना दिली आपल्याला मिळालेली माहिती खरंच वस्तूजण्य होती. अनेक लोकांना लॉक डाऊन मुळे दोन वेळेचे जेवण मिळत नसल्याने ती गैरसोय थोडे दिवस का होईना आपण दूर करू असा विश्वास संचालकांनी दाखविला आणि मग सुत्र हलली लगेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ फुले मॅडम याना भेटून आपण भोजनाची व्यवस्था मोफत करत आहोत याची कल्पना देण्यात आली त्यांनी ही या स्तुत्य उपक्रमा चे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आज रात्री 8 ते 9 या वेळेत मोफत भोजन व्यवस्था जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली. ही मोफत जेवणाची व्यवस्था पुढे आठवडा भर सुरू ठेवणार असल्याचे श्री. निवेंडकर यांनी सांगितले आज 100 लोकांना या मोफत भोजनाचा लाभ घेतला. या वेळी चेअरमन श्री परशुराम निवेंडकर माजी चेअरमन श्री. नितीन तांबे माजी चेअरमन श्री. दिनेश सिनकर माजी चेअरमन राजेंद्र रेळेकर कर्मचारी नेते राजेंद्र जाधव, अभय लाड निलेश गिम्हवणेकर पतसंस्था कर्मचारी संजय साळवी, वीरेंद्र कांबळे यांनी सकाळपासून तयारी केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here