उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

0

मुंबई: भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने स्थापन केलेले सरकार अखेर ७८ तासांत पडले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ५ महाराष्ट्राचे वर्ष मुख्यमंत्री असतील असे, म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दोन टर्ममध्ये उपमुख्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज नाट्यमय राजकारण राज्यात पाहायला मिळाले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आम्ही सक्षम विरोधी म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही. शिवसेनेने आकडे बघून बार्गिनिंग सुरु केलं. जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं. तसेच पत्रकार परिषद संपल्यानंतर मी राज्यपालांकडे राजीनामा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here