मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपले

0

नवी मुंबई : आज सकाळपासून नवी मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्‍यान गेल्या दोन तासांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून, यामुळे नवी मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सायन, पनवेल, ठाणे बेलापूर वाशी, उरण, कंळबोली, शिळफाटा मार्गावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शिवाय घणसोली, कोपरखैरणे, ऐरोलीगाव, गोठवली, बेलापूर, रहावे टी जंक्शन, शिरवणे, कोपरखैरणे आणि रबाले भुयारी मार्गात पाणी साचले. एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सखोल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. नेहमीपेक्षा ग्राहकांचे खरेदीचे प्रमाण 45 टक्क्यांनी घटले. यामुळे आज ग्राहकांनी पाठ फिरकल्याने माल पडून आहे. परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नवी मुंबईसह उपनगरातील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प आहे, तर काही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात नवी मुंबईत 211 ते 240 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बेलापूरमध्ये 221, नेरूळ 240, वाशी 211 तर ऐरोली 212 मिमी पाऊस झाला. 15 ठिकाणी झाडे कोसळल्‍याचा घटना घडल्‍या आहेत. मोरबे धरणाची पातळी 81.87 मीटरपर्यत पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here