दिलासादायक! जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज निम्म्याने घट

0

🔳 24 तासात 259 पॉझिटिव्ह

रत्नागिरी : मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला होता. मागील दोन दिवस जिल्ह्यात सलग पाचशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. सतत वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत होती. मात्र आज आलेले अहवाल काहीसे दिलासादायक ठरनार्रे आहेत. जिल्ह्यात सापडणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या निम्म्याने घटली असुन मागील 24 तासात 259 रुग्ण सापडले आहेत. यातील आरटिपीसीआर चाचणी केलेले 148 तर अँटीजेन चाचणी केलेले 111 रुग्ण आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 15,889 एवढी झाली आहे
सतत वाढणाऱ्या रुग्णासंख्येमुळे चिंतेत असणाऱ्या रत्नागिरीकराना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:21 PM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here