विधानसभा हंगामी अध्यक्षपदी भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती

0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची विधानसभा हंगामी अध्यक्षपदी नियुक्त केली आहे. कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. आठ वेळा ते विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. बुधवारी होणाऱ्या Floor Test साठी विधानसभेचा हंगामी अध्यक्ष नियुक्त करणे अनिवार्य होते.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचासंदर्भात महत्वाचा आदेश दिला. या आदेशामध्ये 27 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता Floor Test म्हणजेच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाणे गरजेचे होते. कारण आमदारांना शपथ देणे तसेच बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया ही हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच होणार आहे. यामुळे हंगामी अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी सायंकाळी राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याल्यानंतर आता त्यांच्याकडे सगळे राजकीय पक्ष त्यांचा व्हीपची माहिती देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here