खेड शहरातील कन्या शाळेची दुरवस्था; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

0

एकेकाळी खेड शहराचे शैक्षणिक वैभव असलेली कन्या शाळा सध्या दयनीय अवस्थेतून जात आहे. 72-73 च्या सुमारास पाहिली ते सातवीच्या वर्गात 250 पेक्षाही मुलींचा पट असलेल्या या शाळेत आताची पटसंख्या केवळ 32 इतकी आहे. कन्या शाळेच्या समोरासमोर असलेल्या दोन लांबलचक इमारती खेडमधील तेव्हाच्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक इमारती होत्या मात्र सद्यस्थितीत या इमारतींची दुरवस्था झाली असल्याने या शाळेत येणारे 32 विद्यार्थी आणि दोन शिक्षक मानेवर टांगती तलवार घेऊन अद्यापनाचे काम करत आहेत.

HTML tutorial

गेल्या पावसाळ्यात इमारतीच्या छपरावर मोठ्या प्रमाणात गावात वाढले होते. खरतर हे गवत काढणे गरजेचे होते मात्र पाऊस गेला तरी हे गवत काढण्यात आले नव्हते. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव टांगणीला लागला होता मात्र कडक उन्हामुळेच सद्यस्थितीत छपरावरील गवत पूर्णतः सुकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गवत सुकले असले तरी इमारतीच्या दुरूस्तीचे घोडे मात्र अडलेलेच असून विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार आजमितीसही कायमच आहे.

कन्याशाळेतील इमारतींमध्ये 8 वर्गखोल्या असून आता फक्त चौथी पर्यंतचे वर्ग भरतात. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्राथमिक शाळेची गेली कित्येक वर्षापासून दुरूस्तीच झालेली नाही. पडझडीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाळेच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाला जाग आलेली नाही. एकीकडे ही इमारत धोकादायक स्थितीत असताना दुसरीकडे दोन्ही इमारतीचे छप्पर गवताच्या विळख्यातच अडकले होते. मात्र प्रशासनास छप्पराची स्वच्छता करण्यास सवड मिळालेली नाही.

विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच धडे गिरवण्याची वेळ येऊन ठेपली होती. छप्परावरील गवत सुकले असले तरी इमारतीच्या पाठीमागे वेलींचा विळखा कायम आहे. गवत सुकल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच धडे गिरवावे लागत आहेत. धोकादायक स्थितीतील इमारतीच्या दुरूस्तीसाठी प्रशासन जागे होणार तरी कधी? असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here