मुंबई | शरद पवारांचं राजकारण सदैव सकारात्मक आहे. कोणी काहीही म्हणो मी शरद पवारांना मानतो. पवारांनी पंतप्रधान व्हावं, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सर्व राजकीय घडोमोडींवर भाष्य करताना संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष दोनवेळा सोडला आणि स्वतःचा नवा पक्ष हिमतीने उभा केला. पन्नास वर्षे संसदीय राजकारणात टिकून राहणं सोपं नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे, वादळे झेलून ते उभे राहिले, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असं राऊतांनी म्हटलं आहे. माझे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. उद्धव ठाकरेंना दिलेल्या शब्दामुळेच इतका संघर्ष केला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
