उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही राणेंनी केली होती.
मुंबई: भाजपने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घेतल्यानंतर शिवसेनेकडून ‘ऑपरेशन देवेंद्र’मधील शिलेदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ट्विट करून राणेंना लक्ष्य केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अखेर मा. नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले. आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे, अशी खोचक टिप्पणी विनायक राऊत यांनी केली.
