जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 15 मुद्दे

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. एवढेच नाही, तर देशातील कोरोना मृतांची संख्याही वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील जनतेला धीर देत आणि कोरोना योध्यांचे कौतुक करत वैद्यकीय सुविधा, लसीकरण आणि लॉकडाउनसाख्या महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील टॉप 15 महत्वाचे मुद्दे :

🔳 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशापुढे मोठे संकट, कोरोनाच्या लढाईला धैर्याने तोंड दिले, तरच आपण त्यात विजय मिळवू शकतो – पंतप्रधान मोदी

🔳 गरजूंना ऑक्सिजन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत – पंतप्रधान मोदी

🔳 यावेळी कोरोना केस वाढताच फार्मा सेक्टरने औषधींचे उत्पादन वाढविले, ते आणखी वेगाने वाढवीले जात आहे – मोदी

🔳 आपण सौभाग्य शाली, आपल्याकडे अत्यंत मजबूत फार्मा सेक्टर – नरेंद्र मोदी

🔳 जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस भारताकडे – मोदी

🔳 राज्य सरकारने लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा – पंतप्रधान मोदी

🔳 देशाला लॉकडाऊनपासून वाचवणे जनतेच्या हातात – पंतप्रधान मोदी

🔳 काही झाले तरी गरज नसताना घराबाहेर पडू नका; पंतप्रधान मोदींचे आवाहन

🔳 भारतात लॅबचे मोठे नेटवर्क, कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे – पंतप्रधान मोदी

🔳 कोरोनाच्या सुरुवातीला देशात वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र, आता पीपीई कीट, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे – पंतप्रधान मोदी

🔳 श्रमिकांचा विश्वास तुटू देऊ नका; राज्य सरकारना पंतप्रधान मोदींचे आवाहन

🔳 सरकारी रुग्णालयात मोफत कोरोना लस यापुढेही मिळत राहणार – पंतप्रधान मोदी

🔳 देशात आतापर्यंत १२ कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण – पंतप्रधान मोदी

🔳 जीवन वाचवीने, उपजिविका वाचविणे आणि आर्थव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचाही प्रयत्न सुरू – पंतप्रधान

🔳 देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स चालक, पोलीस कर्मचारी या कोरोना योद्धांचे कौतुक करतो – पंतप्रधान मोदी

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:58 AM 21-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here