खेड (प्रतिनिधी): मंडणगड तालुक्यातील दहागांव येथील सावमा तसलीम जोगीलकर २२ ही विवाहिता भरणेतून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती तसलीम जोगीलकर यांनी येथील पोलीस स्थानकात दिली आहे. मंडणगड येथील हे विवाहित दांपत्य भरणे येथे राहत होते. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वा.सौ. साबमा ही घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली ती परत न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. ती कोठेही आढळून न आल्याने वेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पतीने येथील पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
