खोपीत बिबट्याचा मुक्त संचार

0

खेड (प्रतिनिधी): खोपी परिसरात बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरू असून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याने वनविभागाने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास खोपी-अवकिरेवाडी येथील जगन्नाथ बाबू अवकिरे यांच्या मालकीच्या बैलाला गावातील शेवरीचा माळ याठिकाणी वाघाने मारल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे गावासह पंचक्रोशीत भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here