देवरूखला किशोर, कुमार गट कॅरम स्पर्धेचे आयोजन

0

 ब्रेक पॉइंट कॅरम क्लब आणि देवरूख येथील स्पोर्ट्स अॅटकॅडमीने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली किशोर आणि कुमार जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा देवरूख येथील पित्रे कलामंचावर येत्या १ डिसेंबर रोजी होणार आहे.

स्पर्धा कुमार आणि कुमारी गट एकेरी (१८ वर्षांखालील), किशोर आणि किशोरी गट (१४ वर्षांखालील) अशा चार गटांमध्ये होईल. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. स्पर्धेसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका आल्यास स्पर्धा होईल. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द केली जाईल. स्पर्धेत खेळताना पांढरा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करायचा आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका येत्या २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह खालील ठिकाणी सादर कराव्यात. गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), दापोली – अनय टकले (९४०५९५३७८६), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here