रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट दोन दिवसात होणार खुला

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून ऑक्सिजन निर्मित प्रकल्प जिल्हा रुग्णालयात सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागली नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील वाढत्या रुग्णांमुळे ऑक्सिजनसाठी धावपळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे सहा प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प पूर्ण होत आला आहे. त्याची प्राथमिक स्वरुपात चाचणी गुरुवारपासून सुरू करण्यात येणार असून दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here