उद्या सायंकाळी ६.४० मिनिटांनी मुंबई येथे शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याच वेळी जल्लोष करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी पुढाकार घेत तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना यावेळी साळवी स्टॉप येथे आमंत्रित केले आहे. या ठिकाणी मोठे स्क्रीन लावून शपथविधी साम्राम्भाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच फटाके फोडून व लाडू वाटून आनंद साजरा केला जाणार आहे. या शपथविधी कार्यक्रमानिमित्त शहरातील मारुतीमंदीर सर्कलला रोषणाई देखील करण्यात येणार आहे.
