युराेपमध्ये पुन्हा एकदा वाढू लागले कोरोनाचे रुग्ण

0

पॅरिस : युरोपातील देशांमध्ये फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटलीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ब्रिटनमधील नवा स्ट्रेन आणि आफ्रिकेतील कोरोनाने तज्ज्ञांची काळजी वाढविली आहे. युरोपात लसींच्या पुरवठ्यावरूनही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फ्रान्समध्ये चार आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या निर्बंधाचा परिणाम देशात दिसत आहे. शाळा आदी शैक्षणिक संस्था बंद आहेत. १ एप्रिल रोजी देशात ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. ती संख्या आता ३६ हजारपर्यंत कमी झाली आहे. जर्मनीतही १० मार्चपासून कोरोनाची लाट आलेली आहे. देशात २९ हजारपेक्षा अधिक रुग्ण दररोज आढळून येत आहेत. तरुणांमध्येही संसर्ग होत आहे. इटलीत मागील वर्षी कोरोनाने अक्षरश: हाहाकार उडविला होता. त्यामुळे देशात रेड झोन, ऑरेंज झोन ठरविण्यात आले आहेत. रेड झोनमध्ये शाळा, महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठाही बंद आहेत. १ एप्रिल रोजी इटलीत दररोज २३ हजार रुग्ण आढळून येत होते. आज ही संख्या १५ हजारांपर्यंत कमी झाली आहे. मृत्यूचा आकडाही आठवड्यात कमी झाला आहे. कोरोनाच्या मागच्या लाटेत मोठा फटका बसलेल्या स्पेनमध्ये संचारबंदी लागू आहे. सध्या या देशात दररोज दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here