🔳 ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा एकमुखी निर्णय
➡ संगमेश्वर : नावडी आणि माभळे परिसरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता संगमेश्वर बाजारपेठेत ८ दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती सरपंच विवेक शेरे यांनी दिली. सरपंच, सर्व सदस्य तसेच सर्व व्यापारी, ग्रामस्थ आणि कृतीदलाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात शनिवारपासून मेडिकल वगळता एकही दुकान न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय विनाकारण फिरणे, मास्क नसणे, गर्दी करणे अशांवर दंड आकारण्यात येणात आहे. बाहेरगावाहून येण्यास प्रतिबंध असून ज्याच्याकडे RTPCR टेस्टचा ताजा रिपोर्ट असेल त्यालाच गावात प्रवेश मिळणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:34 PM 22-Apr-21