जिल्हाधिकारी यांनी साधला कोवीड रुग्णांशी थेट संवाद

0

रत्नागिरी : आज दिनांक 22.04.2021 रोजी कोवीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन रत्नागिरी, रा.भा.शिर्के प्रशाळा, स्क्रीनिंग सेंटर माळनाका रत्नागिरी व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला भेट प्रत्यक्ष भेट मा.श्री.लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हाधिकारी रत्नागिरी व मा.श्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिली. सामाजिक न्याय भवन कोवीड केअर सेंटरमधील रुग्णांशी थेट संपर्क साधून मिळणारा औषधोपचार व जेवण या विषयी संवाद साधला. तसेच कोवीड केअर सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांविषयी, पुरेसा औषध साठा व शासनाच्या मार्गदर्शक प्रोटोकॉलनुसार देण्यात येणारे उपचारांविषयी डॉक्टर व स्टाफशी चर्चा करुन मार्गदर्शन केले. डॉ.आम्रे, डॉ.हातिया, स्टाफ नर्स व वॉर्ड बॉय यांच्या कामांबाबत मा.जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच डॉक्टर व स्टाफ नर्स खूप चांगले काम करत असल्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रा.भा.शिर्के प्रशाळा, स्क्रीनिंग सेंटर माळनाका रत्नागिरी व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला भेट प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यरत असलेल्या कोवीड योध्द्यांना टी-र्शटचे वाटप करण्यात आले. कोवीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन रत्नागिरी येथे कोवाड रुग्ण एकुण 69 ॲक्टीव्ह आहेत. तसेच कोवीड केअर सेंटरमध्ये योगाचे क्लासेस सुरु करण्यात येणार असल्याचे मा. श्रीम. डॉ.बबिता कमलापूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे सोबत मा.श्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.श्रीम. डॉ.बबिता कमलापूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.श्रीम.निशादेवी वाघमोडे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व श्री.डॉ.एम.डी.गावडे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:03 PM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here