रत्नागिरीतील पाच एलआयसी विमा प्रतिनिधींना अमेरिकेतील मानाचा एमडीआरटी बहुमान

0

रत्नागिरी : कोरोनाच्या संकटातही एलआयसीच्या रत्नागिरी शाखेतील पाच विमा प्रतिनिधींना या आर्थिक वर्षात अमेरिकेतील मानाचा एमडीआरटी बहुमान प्राप्त झाला आहे. आघाडीचे विकास अधिकारी चंद्रशेखर पटवर्धन यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली या प्रतिनिधींनी काम केले. एलआयसी रत्नागिरी शाखेच्या विमा व्यवसायाच्या इतिहासात प्रथमच पाचजणांना हा मान मिळाला आहे. विकास अधिकारी पटवर्धन यांच्या पाच प्रतिनिधींना एकाचवेळी हा मान प्राप्त झाल्याने तो एक विक्रम झाला आहे. त्यांच्या संघटनेतील प्रसाद हातखंबकर, सुनीता कातकर, ऋता पंडित, योगेश नातू आणि शिल्पाताई पटवर्धन या पाच विमा प्रतिनिधींनी हा मान प्राप्त केला आहे. चार विमा प्रतिनिधी एमडीआरटी २०२१ साठी, तर शिल्पाताई पटवर्धन एमडीआरटी २०२२ या वर्षासाठी अवघ्या ३ महिन्यांत पात्र झाल्या आहेत. सुमारे ३५ लाखाचा प्रथम हप्त्याचा विमा व्यवसाय एमडीआरटी मानांकनासाठी आवश्यक असतो. आयुर्विमा व्यवसायात हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. एलआयसी विमा क्षेत्रामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून अनेक संधी असून नवीन पिढीने आणि तरुणांनी विमा व्यवसायात पदार्पण करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन चंद्रशेखर पटवर्धन यांनी केले आहे. मिलियन डॉलर राउंड टेबल ही अमेरिकेत १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. दरवर्षी जगभरातील ३० हजार विमा प्रतिनिधी अमेरिकेतील संमेलनात सहभागी होतात. हा बहुमान प्राप्त करण्यात विमा अधिकारी पटवर्धन यांचे मोलाचे मार्गदर्शन, सूचना करोना काळात सक्षम पाठिंबा लाभल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले. या सर्वांचे अभिनंदन शाखाधिकारी हेमंत जोशी आणि उपशाखाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 23-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here