“किती असंवेदनशील! राजेश टोपे, तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

0

विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली होती. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. याच दरम्यान आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही राष्ट्रीय बातमी नसल्याचं धक्कादायक विधान केलं. यारून आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टोपेंवर जोरदार निशाणा साधला. “किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा. त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी दुःख तरी व्यक्त करा. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो,” अशा शब्दांत भातळकर यांनी टोपे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 23-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here