अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात होणार रि-एन्ट्री

0

बिग बॉस मराठी सीझन २ मधून घराघरात पोहचलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. मात्र जेव्हा बिचुकले घरातुन एक्झिट घेणार कळताच त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. मात्र आता अभिजित बिचुकलेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री करणार आहे. एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी  2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण  बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले. बिग बॉस शोमुळे बिचुकलेची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. गुगलवर अभिजीत बिचुकलेचा सर्च वाढला आहे.  सर्चच्या बाबतीत त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले आहे.२१ जून म्हणजे, ज्या दिवशी त्याला अटक झाली, त्यादिवशी अभिजीत बिचकुले हे नाव सर्वाधिक सर्च केल्या गेले. सर्चच्या या शर्यतीत महेश मांजरेकर आणि अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनाही त्याने मागे टाकले होते. बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली . त्याला बिग बॉसच्या घरातून २१ जूनला सातारा पोलिसांनी अटक केली. या केसमध्ये २२ जूनला जामीनही मिळाला होता. पण, त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्यांनंतर बिचुकलेला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावं लागले होते. अटक केल्यानंतर बिचुकलेने एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती की, मला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढण्याचा हा कट होता. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने हा राजकीय कट आखण्यात आला असल्याचे त्याने सांगितले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here