अनेक दिवसांपासून लांबणीला लागलेला सत्ता स्थापनेच्या प्रश्नाला आता पुर्णविराम मिळाला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन होणार आहे. या आधीची बोलणी सुरु असताना शिवसेनेने अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची देखील ऑफर दिली होती मात्र पहिल्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असे सांगण्यात आले होते.
१) राष्ट्रपती राजवट लगेच हटली
जर शिवसेना सरकारने भाजपच्या आधी सत्ता स्थापनेसाठी दावा केला असता तर भाजप सरकारने आणि राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट राज्यातून उठवण्यासाठी उगाच महिनाभराचा वेळ घातला असता आणि अशा वेळेस इतर पक्षांचे आमदार फुटून भाजपकडे जाण्याचीही भीती होती मात्र अजित पवारांनी केलेल्या कारनाम्यामुळे राष्ट्रपती राजवट लगेच हटवली गेली आणि नंतर फडणवीस सरकारने माघार घेतल्याने शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा रस्ता मोकळा झाला.
२) भाजप शिवसेना या पुढे अजित पवारांवर आरोप करु शकणार नाही
अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी केल्यामुळे एवढ्या दिवसांपासून अजित पवारांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या भाजपला आता अजित पवारांवर आरोप करण्यासाठी नैतिक अधिकार राहिलेला नाही एवढेच नाही तर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्यामुळे शिवसेना देखील या पुढे अजित पवारांवर काहीच बोलू शकणार नाही.
३) राष्ट्रवादीत अजित पवारांचे वजन वाढले
शरद पवारांची इच्छा होती की, केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्याच अजित पवार यांनी पक्षाचे नेतृत्व करत काम पहावे मात्र पक्षात इतरही मोठे नेते ज्यात छगन भुजबळ, वळसे पाटील, जयंत पाटील अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. आता अशा वेळेस पक्षात अजित पवारांचे वाढल्याचे दिसते आणि पुढील वाटचालीसाठी अजित पवारांकडे नेतृत्व सोपवले जाईल.
४) यामुळे शरद पवारांनी अजित पवारांच्या रूपाने एकाच बाणात चार गोष्टी साध्य केल्यात का ?
तीनही पक्षांसोबत सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरु असताना जर राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी केली असती तर कॉंग्रेसकडून चर्चेस नकार मिळाला असता. आता मात्र, हे सर्व एवढ्या पुढे आले आहे की, आता राष्ट्रवादीला अडीच वर्षाचा मुख्यमंत्री देण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही कारण राष्ट्रवादीच्या या मागणीला आताच्या क्षणाला कोणीही नकार देऊ शकत नाही.