आंबा घाटात दोन कारची समोरासमोर धडक

0

आंबा घाटात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. अपघातातील एक गंभीर आहे. हा अपघात एका दुचाकीला वाचवताना झाला.
साखरपा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार वासुदेव हरी गोंडाळ (वय 52)रहाणार शीळ राजापूर हे आपल्या ताब्यातील क्रेडा ही गाडी (क्र MH 43 BE 4529) घेऊन मुंबई इथून राजापूरला जात होते. कोकण मार्ग खराब असल्याने ते कराड मलकापूर मार्गे प्रवास करत होते. मलकापूर इथून पुढे आंबा घाटात गाडी आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना त्यांची धडक दुचाकीच्या पाठुन येणाऱ्या हुन्दाइ आय टेन ह्या गाडीला बसली. हा अपघात सकाळी आंबा घाटात गायमुख परिसरात सकाळी 9:30 च्या सुमारास झाला.
हा अपघात इतका जोरदार होता की त्यात चालक वासुदेव गोंडाळ यांना आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या अन्य एकाला (नाव समजू शकले नाहे) दुखापत झाली. गाडीत मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सीमा गोंडाळ यांनाही दुखापत झाली. पुढच्या सीटमधे अडकल्याने त्यांचे दोन्ही पाय फ्रकचर झाले.
सीमा गोंडाळ यांना खाजगी वाहनाने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर पी बी आदाते यांनी त्यांच्यावर आवश्यक ते प्राथमिक उपचार केले. अधिक उपचारांसाठी गोंडाळ यांना मुंबईत हलविन्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here