सिंधुदुर्ग: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शिवभोजन थाळी एक महिना मोफत

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात एकूण १२ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली असून त्याचा दैनिक इष्टांक ८२५ एवढा आहे. वेंगुर्ला तालुका वगळता सध्या ११ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. राज्य शासनाने उपहारगृहे, हॉटेल यांना फक्त पार्सल सुविधेचा परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरण्याच्या नियमांचे पालन करुन एक महिन्यासाठी पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या इष्टांकामध्ये एक महिन्याकरिता दीड पट वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून १२३७ गरीब व गरजू जनतेला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेणे शक्य होणार आहे. कोरोनाच्य पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करुन शिवभोजन केंद्रातून सकाळी ७ ते ११ या कालावधीत किंवा जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आदेशात नमूद केलेल्या वेळेनुसार पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना मोफत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजू जनतेने शिवभोजन योजनेचा लाभ घ्यावा. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील २ लाख १२ हजार ९७६ गरजू जनतेने शिवभोजन योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 24-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here