नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला मिळणार 300 व्हेंटिलेटर्स

0

नागपूर : नागपूरसह महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोनाचा उद्रेक पाहता व्हेंटिलेटर्स, रेमडेसीवीर आणि ऑक्सीजन तसेच अन्य औषधे मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांतून त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्याकडे व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. ना. गडकरींच्या या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली आहे.

आंध्रप्रदेश सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्यया एका निवेदनात या मागणीचा उल्लेखही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांची तत्परता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्याशी संपर्क साधला व व्हेंटिलेटर्स दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. कोरोनाच्या काळात देशातील विविध राज्यांच्या मदतीसाठी आंध्रप्रदेश शासन सदैव प्रयत्नशील असते. त्यातच आता महाराष्ट्राला गरज असल्यामुळे आम्ही शासनाला 300 व्हेंटिलेटर्स पाठवीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आंध्रप्रदेश शासनाने घोषणा केल्यानंतर आता हे व्हेंटिलेटर्स टप्प्याटप्प्यात महाराष्ट्रात येणार आहेत. यामुळे नागपूर व विदर्भातील अनेक रुग्णांना दिलासा मिळेल. संपूर्ण विदर्भातील कोरोनाग्रस्त रुग्ण औषधापासून वंचित राहू नये म्हणून गडकरी यांनी रेमडेसीवीर हे इंजेक्शनही उपलब्ध करून दिले आहेत. ऑक्सीजन प्लांटसाठी बैठकी घेणे, त्यांना प्रोत्साहित करणे, शहरातील खाजगी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांनाही ऑक्सीजन प्लांटसाठी प्रोत्साहित करणे, बैठकी त्यांनी घेतल्या. कोरोना काळात औषधोपचारासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने या कामांना गती दिली आणि आवश्यक ती उपकरणे आणि इंजेक्शन यांची उपलब्धता करून दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 24-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here