लग्नाचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक

0

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे आणि तिच्या आईचे सुमारे २ लाख ५ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबवून फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरोधात तसेच त्याच्या दोन नातेवाईकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे. मुस्ताक ईसा काझी,बानु काझी आणि आलम नूरमहंमद (सर्व रा. केळ्ये,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अलमिरा इलियास काझी (रा. कोकणनगर, रत्नागिरी) हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार,१७ ऑक्टोबर रोजी तिची मुस्ताकसोबत

HTML tutorial

ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांन लग्न करण्याचे ठरवले होते. यातूनच ६ नोव्हेंबर रोजी अलमिरा | आणि तिच्या आईचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने मुस्ताक घेऊन गेला होता. मात्र, तो अद्याप न परतल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अलमिराने शहर पोलिसांकडे मंगळवारी तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here