चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास चार महिने कारावास

0

रत्नागिरी (प्रतिनिधी) : चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने बुधवारी ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ८ जुलै २०१७ रोजी पहाटे ६ वा. सुमारास पटवर्धनवाडी येथे घडली होती. लियाकत अब्दुल्ला नावडे (३७, रा. मिरकरवाडा,रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ८ जुलै रोजी लियाकत नावडेने पटवर्धनवाडी येथे एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी लियाकतला त्याच दिवशी संध्याकाळी अटक केली होती. या बाबत न्यायालयात खटला सुरु होता. बुधवारी या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने लियाकतला ४ महिने साधा कारावास आणि ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here