रत्नागिरी शहर, तालुक्यात प्रभागनिहाय कोरोना लसीकरण आवश्यक : मुन्ना चवंडे

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मर्यादित लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. त्यात ऑनलाइन नोंदणी असल्याने आणखी गोंधळ उडाला आहे. यावर मार्ग म्हणून शहरात प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेवक तथा भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भात मुन्ना चवंडे यांनी सांगितले की, आपल्याला भारत कोरोनामुक्त करायचा असेल तर आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही भाजपतर्फे जनजागृती आधीपासूनच सुरू केली आहे. परंतु लसीकरण केंद्रे मर्यादित ठेवल्यामुळे लसीकरणाला गती मिळालेली नाही. प्रत्येक प्रभागामध्ये त्या त्या भागाच्या नगरसेवकांवर लसीकरणाची जबाबदारी दिल्यास व प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबवल्यास १०० टक्के लसीकरण होईल. ल्हा प्रशासनाकडून काही मंगल कार्यालयांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची बातमी वाचनात आली. त्याचा फायदा शहरातील नागरिकांना नक्कीच झाला, यात शंकाच नाही. परंतु त्याची योग्य प्रसिद्धी न झाल्यामुळे त्या शिबिरांमध्ये ठरावीक लोकांनाच सहभागी होता आले. आधी त्याची प्रसिद्धी झाली असती, तर जास्त लोक सहभागी होऊ शकले असते. त्यामुळे अशाच प्रकारची लसीकरण शिबिरे प्रशासनामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक प्रभागात आयोजित केली पाहिजेत. तत्पूर्वी अशा शिबिराची माहिती वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमांमार्फत तेथील स्थानिक नागरिकांना मिळाली पाहिजे, असे मुन्ना चवंडे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here