भाजयुमो राज्य कोविड सहाय्यता हेल्पलाइन टीममध्ये डॉ. हृषिकेश केळकर

0

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कोविड सहाय्यता हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजयुमोचे द. रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस डॉ. हृषिकेश केळकर यांचा प्रदेश हेल्पलाइन टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यभरात कोरोना संकटकाळात भाजयुमोचे कार्यकर्ते दिवसरात्र सेवाकार्य करून नागरिकांना मदत करत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेतही सर्व युवा कार्यकर्ते स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून सेवाकार्य करत होते. सेवाकार्य अधिक प्रभावीपणे करता यावे, जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय भाजयुमो अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या, प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली (020) 67326090 या हेल्पलाइनचा प्रारंभ झाला. हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सेवा, हॉस्पिटल, औषधविषयक समस्या, प्लाझ्मा आवश्यकता, डोनेशन, वाढीव नियमबाह्य बिले, अडकून पडलेल्या नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिक माता-भगिनींना घराबाहेर पडता येत नसल्यास त्यांना सहाय्य अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्याचा प्रयत्न येणार आहे. अडचणीच्या काळात या हेल्पलाइनचा अवश्य उपयोग करावा, तसेच ट्विटरवर समस्या कळवावी, कार्यकर्ते मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील, अशी माहिती भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here