दापोलीत 61 लाख 60 हजार रूपये किमतीच्या वाळूची चोरी

0

दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीतील अडखळ, सारंग या ठिकाणाहून 61 लाख 60 हजार रुपये किमतीची 1 हजार 540 ब्रास वाळू चोरीला गेली असल्याचा अंदाज असल्याची तक्रार आंजर्लेचे मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली असून या संदर्भात 5 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 हजार 500 हून अधिक ब्रास वाळू चोरी होत असताना ती पकडण्यासाठी महसुल विभागाचे अधिकारी कोणाच्या आदेशाची वाट पहात होते, असा सवाल आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

20 एप्रिल रोजी दापोली दौऱ्यावर आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दापोलीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दापोली तालुक्यातील वाळु उत्खननाचा विषय लावुन धरला होता. शासनाचा महसुल बुडविला जात असून महसुल विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचेही पत्रकारांनी उदय सामंत यांना सांगितल्यावर त्याची गंभीर दखल सामंत यांनी घेतल्यावर 22 एप्रिल रोजी दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्या आदेशाने निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर, आंजर्लेचे मंडळ अधिकारी सुधीर पारदुले, दापोलीचे मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, आंजर्लेचे तलाठी उत्तम पाटील, गिम्हवणेचे तलाठी गुरुदत्त लोहार, अडखळचे तलाठी आदित्य हिरेमठ, ताडीलचे तलाठी साईनाथ मिरासे, दापोलीचे तलाठी दीपक पवार, हर्णेचे बंदर निरीक्षक गवारे यांच्या पथकाने आंजर्ले खाडीत होडीने जाऊन म्हैसोंडे पाटीलवाडी येथे उतरून पहाणी केली असता कोणतीही नोंदणी न केलेली 1 लाख रुपये किमतीची सक्शन पंप बसविलेली फायबर बोट आंजर्ले खाडीत आढळून आली सदर बोट जेसीबीने पाण्याबाहेर काढून अडखळचे पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मौजे अडखळ येथील सर्व्हे नंबर 22/104 येथे संशयित रिझवान काझी यांनी अनधिकृत वाळू उत्खननाचा प्लॉट तयार करुन 19 लाख 20 हजार रुपये किमतीची सुमारे 480 ब्रास वाळू , सर्व्हे नंबर 35/1 व 34/3 मध्ये संशयित दिनेश यशवंत कदम यांनी अनधिकृत वाळू उत्खननाचा प्लॉट तयार करुन 13 लाख रुपये किमतीची 325 ब्रास वाळू, सर्व्हे नंबर 37/4 मध्ये संशयित बिलाल काझी यांनी 16 लाख रुपये किमतीची 400 ब्रास वाळू, सव्हें नंबर 37/5 मध्ये संशयित अकबर काझी यांनी 2 लाख 40 हजार रुपये किमतीची 60 ब्रास वाळू, मौजे सारंग येथील सर्व्हे नंबर 26/1 येथे जागा मालक अनंता जोशी वगैरे 6 यांचे मिळकतीत संशयित गुलाम हमदुले यांनी 11 लाख रुपये किमतीची 275 ब्रास वाळू चोरी केल्याचा अंदाज तेथे असलेल्या खडशाच्या साठयावरुन महसुल विभागाच्या अधिकाÚयांनी व्यक्त केला आहे. वाळू चोरीचा हा अंदाज व्यक्त करुन मंडळ अधिकारी सुधीर पारदुले व मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी प्रत्येक ठिकाणचे पंचनामे केले असून आंजर्लेचे प्रभारी मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांनी दापोली पोलिस ठाण्यात वाळूचे उत्खनन करुन चोरी केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार 5 संशयितांवर भा.द.वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत. महसुल विभागाच्या पथकाला एकाही ठिकाणी वाळुचा साठा मिळालेला नाही मात्र केवळ प्रत्येक ठिकाणी असलेल्या खडशाच्या साठयावरुन महसुल विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी सुमारे 1 हजार 540 ब्रास वाळू चोरीचा अंदाज व्यक्त करुन ती चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:19 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here