भारतात कोरोना लसीकरण मोहिमेचे 100 दिवस पूर्ण

0

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतात आयोजित जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड19 प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रांची एकूण संख्या 14.19 कोटीच्या पुढे गेली आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 20,44,954 सत्रांद्वारे एकूण 14,19,11,223 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये 92,98,092 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),60,08,236 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,19,87,192 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), , 63,10,273 आघाडीवरील कर्मचारी(दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 4,98,72,209 लाभार्थी (पहिली मात्रा) , 79,23,295 ( दुसरी मात्रा) ,45 ते 60 वयोगटातल्या 4,81,08,293 ( पहिली मात्रा) , आणि 24,03,633 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 58.78 % मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा नूतन टप्पा 1 मे पासून सुरु होणार आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जाणार आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. 28 एप्रिल पासून नोंदणी सुरु होणार आहे. मागील आठवड्यात भारताच्या औषध नियंत्रक महासंचालनालयाने रशियाच्या स्पुतनिक व्ही कोरोना लसीस अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थित सीमित वापरासाठी तत्वतः मंजुरी दिली. सध्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जात आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु करण्यात आला. केंद्र सरकारने 16 जानेवारी पासून देशातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले. पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिलेली आहे. वॅक्सीन मैत्री ‘ या अभियानाद्वारे भारत अनेक देशांना भारतात निर्मित कोरोना लस पुरवीत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here