मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
