लोटेमध्ये विनापरवाना १९ हजार रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त

0

खेड : तालुक्यातील लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत विनापरवाना देशी व विदेशी दारूचा अवैद्य साठा करून त्याची लाॅकडाऊनच्या काळात विक्री केल्याप्रकरणी मंगेश भडवलकर, सूर्यकांत कोटकर, गणेश दिवाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संशयितांकडून १९ हजार २९५ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा ताब्यात घेतला. ही घटना शनिवार, २४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांना लोटेमाळ येथे विनापरवाना देशी, विदेशी दारूचा अवैद्य साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस नाईक चरणसिंह पवार, पोलीस काॅन्स्टेबल रूपेश जोगी, विनायक येलकर, विशाल धाडवे या पथकाने लोटे येथे छापा टाकला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:33 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here