ठाकरे सरकारने शपथ घेताच रत्नागिरीत महाआघाडीचा जल्लोष

0

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा सुरु झाला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते.  या शपथविधी कार्यक्रमाचे वेळी जल्लोष करण्यसाठी रत्नागिरी साळवी स्टॉप येथे शिवसेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाआघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाता यावे म्हणून या ठिकाणी मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. ढोल ताशांच्या गजरात बेधुंद होऊन कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करत होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर कार्यकर्त्यांनी लाडू वाटप केले. शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या पुढाकाराने आज तालुक्यातून अनेक कार्यकर्ते साळवी स्टॉप येथे एकत्र जमले होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here