नेत्रावती, मत्स्यगंधासाठी संगमेश्वर थांब्यासाठी १ मे रोजीचे उपोषण स्थगित

0

संगमेश्वर : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे तसेच आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सहकार्याची भूमिका आणि सुरक्षेच्या दृष्टीने नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळविण्यासाठी दि. १ मे, २०२१ ला होणारे उपोषण काहीकाळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती निवळल्यानंतर उपोषणाची पुढील दिशा ठरवली जाईल. मात्र आमचा या प्रकरणात पाठपुरावा सुरू असणार आहे, असे निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन आणि त्याचे सहकारी यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here