एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि एक मुख्यमंत्री झाले- पंकजा मुंडे

0

मुंबई | शिवतिर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव यांना शपथ दिली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे न्याल व पदा सोबत आलेल्या सत्ता व संघर्ष याचा योग्य मेळ कराल ही ईश्वर चरणी प्रार्थना, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा त्याचबरोबर विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here