जाकादेवीत बिअर दुकानात तोडफोड करणाऱ्या चौघांना अटक

0

रत्नागिरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जाकादेवी येथील बिअर शॉपीमध्ये घुसून त्यातील कामगाराला शिवीगाळ, मारहाण व दुकानाची तोडफोड करुन बियरचे ६ कॅन आणि २ बाटल्या असा एकूण ९४० रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना बुधवार २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा.सुमारास घडली.याप्रकरणी ४ संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. स्वप्नील शिवाजी बोंबले (२४), प्रज्ञेश विजय बोंबले (२३, दोन्ही रा.हातखंबा,रत्नागिरी), विनय रघुनाथ पाचकुडे (१९,रा. करबुडे) आणि सुशिल विश्वास यादव (२९, रा. चवे, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याविरोधात सचिन श्रीकांत मुळ्ये (३६,रा. जाकादेवी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ४ वा.सुमारास या चार संशयितांनी जाकादेवी येथील बियर शॉपीमध्ये घुसून त्यातील कामगाराला शिवीगाळ मारहाण व दुकानाची तोडफोड करुन बियरचे ६ कॅन

HTML tutorial

आणि २ बाटल्या असा एकूण ९४० रुपयांचा ऐवज लांबवला होता.या चारही जणांना ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री १०.३० वा.सुमारास अटक केली. गुरुवारी न्यायालयाने चारही संशयितांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here