थंडीअभावी यंदाचा आंबा हंगाम लांबणार

0

रत्नागिरी (प्रतिनिधी) : नोव्हेंबर अखेरीस गुलाबी थंडीची चाहूल होणे अपेक्षित असताना आवश्यक तो गारवा अद्यापही न आल्याने उलट तापमान वाढीने आंबा हंगमाच्या बेगमीच्या पहिल्या टप्प्यातच यावर्षीचा हंगमा उशिरा सुरू होण्याची भीती बागायतदरांमध्ये आहे. नोव्हेंबर महिन्यात चांगल्या थंडीने तापमान खाली येते. मात्र, अद्याप आवश्यक त्या शितलहरीने वातावरण न व्यापल्याने यंदाचा मोहोर कालावधी लांबण्याची शक्यता टिके येथील बागायतदार अनिरुध्द पवार, संतोष खाडे यांनी वर्तविली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा मुक्काम होता. या कालावीतही ऑक्टोबर हीटचा प्रभाव नाहिसा झाला होता. या कालावधीतही पाऊस झाल्याने फवारणीचे फेरे बागायतदारांना घेता आले नाही. आता नोव्हेंबरअखेरीस आवश्यक तो गारवा नसल्याने मोहोराला बळ देणारी फळधारणेत व्यत्यय येत आहे. त्यामुळे यंदाचा हंगम उशिरा सुरू होण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here