पोकलेनमधील डिझेल चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडमळा येथे एका ठेकेदाराच्या पोकलेन मशिनमधील डिझेल चोरल्याप्रकरणी ऑपरेटर व त्याच्या सहाय्यकांवर चिपळूण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत येथील माजी नगरसेवक राजेश देवळेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोकलेन ऑपरेटर सोनू सुरेंद्र वर्मा, मनोजकुमार सुरेश राम (बिहार, सध्या रा. कोंडमळा) व क्वालिस गाडीवरील चालक बाबूराम अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडमळा येथील या तिघांनी २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ४९०० रूपये किमतीचे ७० लीटर डिझेल चोरल्याचे पुढे येत आहे. ऑपरेटर व हेल्परच्या ताब्यात पोकलेन असताना डिझेल काढून घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here