गोव्यात 3 मे पर्यंत कडक लॉकडाऊन

0
Goa Chief Minister Pramod Sawant address the media during a press conference ahead of IFFI 2019 inauguration in Goa on Tuesday. | DH Photo: Pushkar V

गोवा सरकारनेही त्यांच्या राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून या लॉकडाऊनची सुरुवात होणार आहे. 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळ्या गोष्टी राज्यात बंद राहतील असे जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद राहील असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात कॅसिनो,बार, रेस्टॉरंटही बंद असतील मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंटना होम डिलीव्हरीची मुभा असेल असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळपासून 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी गोव्यात आलेल्या पर्यटकांना त्यांचे हॉटेल सोडून बाहेर जाता येणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:29 PM 28-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here