“केंद्र सरकारच्या खोट्या आत्मविश्वासामुळं देशावर ऑक्सिजन संकट; आरोग्यमंत्र्यांना काढून टाका” : पृथ्वीराज चव्हाण

0

मुंबई : देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. दिल्लीत ५ महिन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिवांनी मेडिकलच्या गरजेसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत चांगली स्थिती आहे असा दावा केला होता. मागील १० महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असं सांगितले होतं असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते. सरकार ऑक्सिजनची पूर्तता करण्यास अयशस्वी ठरलं आहे. त्यामुळे देशावर अभूतपूर्व ऑक्सिजन संकट उभं राहिलं आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे. देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्लीच्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागले. हे त्रासदायक चित्र आहे असं त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 28-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here