रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक २९ डिसेंबरला

0

रत्नागिरी : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. २९ डिसेंबर ला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरात आचारसंहिता लागू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजेच शिवसेनेच्या वतीने प्रदीप उर्फ बंड्या साळवी निवडणूक लढवणार आहेत. राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आले असले तरी रत्नागिरीतील चित्र मात्र वेगळे दिसत आहे. बिजेपिकडून राजेश सावंत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर शहर विकास आघाडीच्या माध्यामतून मिलिंद कीर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बसपा यांच्या पाठींब्यावर आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराविरूद्ध लढू असा विश्‍वास मिलिंद कीर आणि राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची अनुपस्थिती मात्र जाणवली. राज्यस्तरावरून एखादा आदेश आल्यास हि आघाडी किती टिकेल याबाबत देखील शंका उपस्थित होत आहेत

IMG-20220514-WA0009

नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत शहर विकास आघाडीचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ही निवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बसपा यांच्या पाठींब्यावर आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराविरूद्ध लढू असा विश्‍वास मिलिंद कीर आणि राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी ठामपणे पत्रकार परिषदेत सांगितले.
आचारसंहिता लागण्यापुर्वी काही तास आधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निलेश भोसले, बसपाचे राजेंद्र आयरे, मनसेचे छोटू खामकर, अनिकेत पवार यांचासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांची अनुपस्थिती होती; परंतु ते आमच्याबरोबरच आहेत, असे शहर विकास आघाडीचे उमेदवार कीर यांनी सांगितले. ते म्हणाले, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित यांना शिवसेनेने राजीनामा द्यायला लावून ही पोटनिवडणुक लादली आहे. जनतेच्या मतांचा अनादर शिवसेनेने केलेला आहे. जनतेच्या करातून कपात केल्या जाणार्‍या निधीतून हा खर्च होणार आहे. यावर होणारा साठ लाख रुपयांचा खर्च शिवसेनेकडून वसुल करावा अशी मागणी आहे.
कीर यांनी शिवसेनेचे प्रभारी नगराध्यक्ष यांच्यासह आमदार उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, रत्नागिरी शहरातील विकास खूंटीला टांगला आहे. निवडणुका तोंडावर आल्यानंतर रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरु झाली आहेत. तीही स्थानिक आमदारांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी स्वतः  करुन देऊ असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यावर सव्वा कोटी रुपये पालिकेकडून खर्च केले जात आहेत. शहरातील पाणी प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मी नगराध्यक्ष असताना मंजूर झालेली योजनेच काम आजच्या घडीलाही सोळा टक्केच झाले आहे. रस्ते गटारांची कामे प्रलंबित राहिली असून पाणी करात कपात होणे आवश्यक आहे. ते प्रयत्न केले जात नाहीत. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पुढील 8 ते 9 महिन्यात सुमारे 500 कोटींचा निधी आणेन. भटकी कुत्री, उनाड गुरे यांचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर शहरातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयटीच्या धर्तीवर प्रकल्प शहराजवळ सुरु करण्याचा माझा प्रयत्न राहील. नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा उमेदवार निश्‍चित झाला होता. त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढणार. शिवसेनेचा प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार करू; परंतु स्थानिक पातळीवरही आघाडी करा, असे कोणतेही संकेत वरीष्ठांकडून दिलेले नाहीत, असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेट्ये यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here