कोरोना पार्श्वभूमीवर ना. उदय सामंतांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत या सर्व लोकप्रतिनिधीनी आपली मते मंडळी व काही सूचना देखील केल्या. या सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळासाहेब माने, बीजेपी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, बाबाजी जाधव, रमेश कीर, बशीर मुर्तुझा आदि नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकी बाबत अधिक माहिती देताना ना. उदय सामंत म्हणाले कि बाळासाहेब माने यांच्या नर्सिंग कॉलेजच्या ४० विद्यार्थिनी महिला रुग्णालयात काम करणार आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम जिल्ह्यात पुन्हा राबवण्यात येणार आहे. १०० बेडचे नवीन कोव्हीड सेंटर क्रीडा संकुलात सुरु होणार आहे. खेड नगरपालिकेचे २५ बेडचे कोव्हीड सेंटर सुरु होणार आहे. तसेच परवानगी न घेता सुरु करण्यात आलेल्या हॉस्पिटलनि तातडीने परवानगी घ्यावी असे असे देखील ना. उदय सामंत यांनी सांगितले आहे. लसीकरण मोहिमेचे नियोजन येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे. शिवाय १३ नव्या रुग्णवाहिकाना मान्यता मिळाली असून येत्या ५ दिवसात या रुग्णवाहिका रत्नागिरीत येतील अशी माहिती ना. उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
07:10 PM 28/Apr/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here