रत्नागिरी : शहरातील कीर्तिनगर येथे टेम्पोच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संशयित टेम्पोचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय गणपत सावंत (वय ४७, रा. कीर्तिनगर) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. चालक सावंत हे टेम्पो (एमएच-०८डब्ल्यू-००७०) घेऊन मारुती मंदिर ते मजगाव असे जात होते. कीर्तिनगर रस्त्यावर पादचारी उस्मान कासम भाटकर (६८, रा. कदमवाडीकीर्तिनगर) हे चालत जात असताना टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
