जिल्ह्यात 791 पॉझिटिव्ह रुग्ण; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 791 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 601 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 190 रुग्ण
अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 791 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 21 हजार 069 झाली आहे. जिल्ह्यातील सापडलेल्या 791 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 237, दापोली 38, खेड 109, गुहागर 80, चिपळूण 189, संगमेश्वर 43, मंडणगड 2, राजापूर 39 आणि लांजा तालुक्यात 54 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 14.41% आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 29-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here