रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा ८ व ९ जानेवारीला डेरवण (ता. चिपळूण) येथे होणार आहेत. त्यापूर्वी डेरवण येथे पंच प्रशिक्षण होईल. शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या केंद्र, बीट तालुका आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश आहे. सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट तर वैयक्तिकमध्ये ५०, १०० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक या खेळांचा समावेश आहे. या स्पर्धा पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी अशा गटात होणार आहेत. प्राथमिक शाळांच्या केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, बीटस्तर क्रीडा स्पर्धा दुसऱ्या आठवड्यात तर तिसऱ्या आठवड्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि ८ व ९ जानेवारी २०२० ला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा डेरवण येथे होतील.
