रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील कोकम, चिकू आणि काजू या फळांना ‘जीआय’ मानांकन जाहीर झाले असताना या उत्पादनाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोकण मेवा अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत कोकणातील बागायतदारांना सहभागी करुन घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी योजना राबविण्यात आली आहे. कोकणातील कोकम, चिकू,
आंबा, काजू या फलोत्पादनांना भौगोलिक मानंकन मिळाले आहे. मात्र आंब्याला मानांकनाची ओळख मिळाल्यानंतर कोकणातील बागायतदारांनी या नोंदणीसाठी प्रतिसाद दिला. मात्र कोकणातील पारंपरिक उत्पादन असलेल्या कोकम, काजू, चिकू या उत्पादनांना कोकणातील ओळख मिळूनही हे फलोत्पादन घेण्याबाबत कोकणातील बागायतदारांची निरूत्साह आहे. यासाठी आता कोकण मेवा अनुदान योजना राबविण्यात आली आहे. यासाठी कोकणातील बागायतदारांना ऑनलाईन नोंदणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी तालुकास्तरीय कृषीविभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
